पावसावरील कविता स्पर्धा-2026 📅 2026-09-03 17:13:34 ✍️ सुहास लहुरीकर | तोच आपला आधार
तो आला बरसला
मनाला सुखावून गेला

तप्त होती धरणी
झाली तृप्त धरणी

पिके डोलू लागली
स्वप्ने फुलू लागली

प्रफुल्लित झाला बळीराजा
निसर्ग नवपालवीने बहरला

उन्हापासून मिळाला दिलासा
मृद्गंध दरवळू लागला

सृष्टी बहरली पण,
रस्ते पाण्यात हरवले

काही दरडी कोसळल्या,
वीजेने जीव घेतले.

घरं उद्ध्वस्त झाली
संसार वाहून गेले

तो जीवन देणारा
तरीही परीक्षा घेणारा

निसर्ग जपूया आपण
तोच आपला आधार