पावसावरील कविता स्पर्धा-2026 📅 2026-09-02 15:14:08 ✍️ चंद्रशेखर प्रभाकर कासार | नक्षत्रांच गणित
नक्षत्रांच गणित
पावसाच्या कविता शृंखलेत अकबर बिरबलाची गोष्ट वाचली आणि त्यावरून कविता लिहिली.
भारतवर्षात तीन हंगाम असतात उन्हाळा, हिवाळा, पावसाळा आणि सहा ऋतू असतात शरद , शिशिर, हेमंत, वसंत, ग्रीष्म, वर्षा ह्या ऋतूंचा प्रवास सत्तावीस नक्षत्रांमधून होत असतो या सत्तावीस नक्षत्रांपैकी नऊ नक्षत्रे ही वर्षा ऋतूत येतात. आणि त्याच कालावधीत पाऊस पडतो. ह्या पर्जन्यमान कालावधीत नऊ नक्षत्रात जर पाऊस पडला नाही तर सगळीकडे दुष्काळ पडतो म्हणजेच सर्व शुन्य होते, या अर्थाने ही कविता नक्षत्रांच गणित....

नक्षत्रांच गणित

'जेष्ठात' आल्या 'रोहिण्या '
चार दिसाच्या पाहूण्या
बळीराजा पाहे वाट
'मृगाचा' राहे थाटमाट

पाठीमागून ते आले
'आद्रा' अन् 'पुनर्वसू '
बळीराजाच्या दिलात
धकधक अन् डोळ्यात आसू

'आषाढात' आला 'पुष्य '
बळीराजा करी भाष्य
येईल वरूण राजा
भरेल जोमाने शेष

बघा वळून आले 'आश्लेषा '
बळीराजाच्या वाढल्या आशा
नदी-नाले वाहतील भरून
शेतं पिक वाढतील तरारून

'श्रावणाच्या' आल्या सरी
'मघा' 'पुर्वा' अधूनमधून
ऊन-सावलीचा खेळ करी

'भादव्यात' येतो भरून राहून राहून
'उत्तरात' पडे प्रश्न
आता होते कडक ऊन
मग तळे भरले कुठून?

प्रश्न सोपा बिरबलाचा
कोडे पडले अकबराला
उत्तर शोधावे कुठून

सत्तावीस वजा नऊ बरोबर शुन्य
२७ - ९ = ०
गणित सोडवा विचार करून
गणित दाखवा सोडवून
गणित दाखवा सोडवून