पावसावरील कविता स्पर्धा-2026 📅 2026-09-02 15:22:15 ✍️ रावसाहेब कळसे | पाऊस
पाऊस
पावसाच्या आल्या धारा
हर्षित जाहली वसुंधरा
भिजला परिसर सारा
स्पर्शे अलगद गार वारा ..

थंडगार झाला वावर सारा
कोकीळेचा आवाज न्यारा
वनी मोर दिसे नाचरा
पसरुन आपुला पिसारा ..

नसे आव्हान नियतीस
मर्यादा मानवी प्रयत्नांस
मृगाचा हा आला पाऊस
वाऱ्यासंगे पसरे कोस कोस ..

तोड नसे वर्षा ऋतुला
तळी भरुन पिके डोलायला
धरती हिरवीगार करायला
सज्ज होऊन पाऊस आला ..

सारे जीवजंतू होती निर्भर
जगती या, पावसा तुजवर
पाणीच असते जीवन धरेवर
त्याविन जगणे अशक्य भूवर ..

बागडे बाळगोपाळ अंगणी
पक्षी स्वच्छंद उडे गगनी
त्यांचेच जणू आकाश धरणी
पावसाच्या उदंड आठवणी ..

रावसाहेब कळसे