सिनेमा कधीकधी वेगळीच आणि विलक्षण माहिती देऊन जातो.ती कळल्यावर ज्ञानात भर पडतेच पण जगात काय काय गोष्टी अस्तित्वात आहेत हे कळून मती गुंग होते.
या सिनेमाने असाच विलक्षण अनुभव दिला.
Swear म्हणजे शपथ इतकाच अर्थ आजवर माहिती होता.पण या शब्दाचा आणखी एक अर्थ शिवीगाळ किंवा तत्सम शब्द उच्चारणे असाही आहे या बोधापासून सिनेमाचा प्रवास सुरू होतो.
जॉन डेव्हिडसन या स्कॉटिश माणसाची ही खरीखुरी गोष्ट आहे. Taurette Syndrom हा दुर्मिळ आणि दुर्धर ,चेतासंस्थेशी संबंधित असलेला आजार झालेला जॉन डेव्हिडसन या आजारावर मात करत स्वतःची प्रगती करून घेतोच पण या आजाराबद्दल समाजात जागृती निर्माण व्हावी यासाठी विशेष प्रयत्नही करतो.
या कार्याबद्दल त्याला इंग्लंडच्या राणीकडून गौरवण्यात येते.या सगळ्या प्रवासाची गोष्ट या सिनेमातून आपल्यासमोर मांडण्यात आली आहे.
काय असतो हा टॉरेट सिंड्रोम ? तर चेतासंस्थेत काही बिघाड झाल्यामुळे बालपण किंवा किशोरावस्थेत या आजाराची सुरुवात होते.
या आजारात चेहऱ्यावरील व हातापायाचे स्नायूवरील ताबा कमी होत जातो व हे स्नायू अनैच्छिक हालचाली करू लागतात.जसे की डोळे मिचकावणे, भुवया उडवणे, चेहरा वेडावाकडा करणे, थुंकणे, ठोसा मारणे, तोंडाने उगीचच आवाज करणे, शिव्या देणे इत्यादी...हे सगळे पाहिल्यावर अर्थातच या माणसांना घरात आणि समाजात काय वागणूक मिळणार हे कोणीही सहज समजू शकतो.
आजाराचे निदान लवकर होतच नाही.त्या मुलाला,मुलीला हे सगळे मुद्दाम करतोय असे ठरवून घरी दारी शिक्षा करणे ही पहिली पायरी.क्वचित निदान झाले तरी पुढे सार्वजनिक जीवनात वावरताना चेष्टा,अपमान, मारामारी,पोलिसांकडून चोप किंवा अटक हे ठरलेले.किती कठीण आहे ना यांचे आयुष्य...
जॉन डेव्हिडसन या सगळ्या दुष्टचक्रातून जातो पण त्याच्या सुदैवाने त्याच्या आयुष्यात दोन चांगली माणसे येतात आणि त्याचे आयुष्य बदलून जाते.
आई,वडील ,बहीण असे कुटुंब असलेला जॉन फुटबॉल खेळात हुशार असतो.13,14 वर्षांचा असताना जॉनमध्ये अचानकपणे या आजाराची लक्षणे दिसू लागतात. घरी आणि शाळेत जॉन खोडसाळपणाने असे करतो आहे असेच वाटते.शाळेत सरांच्या छड्या आणि घरात फायरप्लेसकडे तोंड करून जेवण्याची शिक्षा तो बिचारा निमूटपणे त्याचा काही दोष नसताना भोगू लागतो.काही दिवसातच त्याला शाळेतून काढून टाकण्यात येते.घरात वडील त्याच्या त्रासामुळे घर सोडतात एवढेच नव्हे तर आईपासून विभक्त होतात.आई त्रासिकपणे त्याला सहन करत राहते.
अशा परिस्थितीत तो तारुण्यात प्रवेश करतो.अर्धवट शिक्षण,असला आजार त्यामुळे कुठे नोकरी मिळण्याची शक्यता नसतेच.त्यातल्या त्यात त्याच्या आजाराचे निदान आणि नामकरण झालेले असते एवढीच जमेची गोष्ट.
एकदा त्याचा शाळेतला मित्र मरे त्याला खूप वर्षांनी भेटतो.तो ऑस्ट्रेलियावरून त्याच्या आजारी आईला भेटण्यासाठी आलेला असतो.तो जॉनला घरी जेवायला बोलावतो.
त्याची आईने डॉटीने पूर्वी मेंटल हेल्थ नर्स म्हणून काम केलेले असते.तिला जॉनच्या आजाराबद्दल कळते.तिला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटते. कॅन्सरचे निदान झाल्यामुळे आपल्याकडे थोडे दिवस उरले आहेत तर या मुलाचे काही भले करता येते का पाहू असा विचार करून ती जॉनला स्वतःच्या घरी ठेवून घ्यायचा निर्णय घेते. जॉनची आई त्याला सांभाळून कंटाळलेली असते त्यामुळे ती लगेच परवानगी देते.आता जॉन डॉटीकडे राहू लागतो.ती संयमाने,चिकाटीने त्याला सहन करते,त्याच्यात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करते.प्रोत्साहन देते.लवकरच तिच्या ओळखीने त्याला कम्युनिटी सेंटरमध्ये care taker म्हणून नोकरी मिळते.तिथे टॉमी नावाचा आणखी एक वयस्कर सज्जन माणूस त्याला भेटतो.तोही जॉनला समजून घेतो.त्याच्या कामसूपणाचे कौतुक करत त्याचा आत्मविश्वास वाढवतो.टॉमीचे अचानक निधन होते. त्याची जागा जॉनला देण्यात येते.आर्थिक स्थैर्य मिळाल्यावर जॉनी काहीसा सैलावतो. आजारामुळे अजूनही काहीबाही अनावस्था प्रसंग त्याच्यावर ओढवत असतातच.
एकदा त्याच्यासारखा आजार असलेली एक मुलगी त्याला भेटायला येते.तिच्याशी बोलून ,भेटून जॉनच्या डोक्यात एक कल्पना येते. हा आजार असलेल्या माणसांना एकत्र करून काही ट्रेनिंग द्यावे, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात,त्यांच्या पालकांना आणि इतर समाजघटकांना या आजाराबाबत मार्गदर्शन करावे ,त्याबद्दलचे गैरसमज दूर करावेत असे बरेच काही त्याच्या डोक्यात येते.
आणि टप्प्याटप्प्याने तो या सगळ्या गोष्टी साध्य करतो.आजारातून बरी झालेली डॉटी त्याला मदत करते...लवकरच त्याची कीर्ती सर्वदूर पसरते.आणि राणीच्या हातून सन्मान स्वीकारण्याचे भाग्य त्याच्या वाट्याला येते.
अंधाऱ्या बोगद्यातून कित्येक वर्षे प्रवास केल्यानंतर जॉनला उजेडाचे दुसरे टोक अखेर गाठता येते.आजही हा जॉन डेव्हिडसन त्याच्या आजाराला आनंदाने स्वीकारून इंग्लंडमध्ये कार्यरत आहे.
जॉनच्या जीवनाचा हा प्रवास अक्षरशः विस्मयचकित करणारा आहे.आणि तो पडद्यावर प्रभावीपणे, प्रवाहीपणे मांडण्यात दिग्दर्शक कमालीचा यशस्वी झाला आहे...
जॉनच्या दोन्ही वयातल्या भूमिका दोघांनीही अप्रतिम केल्या आहेत.(किशोर वयाचा जॉन, स्कॉट एलिस वॅटसन आणि मोठा जॉन, रॉबर्ट आरमायो) चेहऱ्याच्या हालचाली,tics म्हणजे तोंडाचे आवाज,शिव्या देणे, मान झटकणे,ते केल्यावर ओशाळणे, अपमानाने व्यथित होणे,ते विसरून पुढे जाणे,नंतर आपल्या सारख्या इतर माणसांबद्दल करुणा जागृत होऊन आत्मविश्वासाने काम करणे अशा कितीतरी छटा या भूमिकेला होत्या.
किती कठीण होती ही भूमिका...केवढी मेहनत करावी लागली असेल...ग्रेट...
हा आजार भारतात कोणाला झाला तर त्याचे काय होत असेल याची चिंता लागून राहिली.
आजाराचे प्रकार तरी किती... त्यांचे भोग किती विचित्र आणि वेगळे...ही खिन्न करणारी बोचरी जाणीव या सिनेमाने करून दिली हे अगदी शपथेवर सांगेन मी. I swear ....
(हा सिनेमा सध्यातरी कोणत्याही ott वर नाही. डाउनलोड करून बघावा लागेल.)
@ राजश्री बिराजदार