विषय = श्रावण आणि निसर्ग
( खुला गट -१९ वर्षावरील )
दि . २० / ०६ / २०२६
स्वरचित
काव्यप्रकार = गीत लेखन
शीर्षक = घन निळा बरसला
( चाल = झाल्या तिन्हीसांजा )
ओथंबले घन, वर्षाव जलधारा !
घन निळा बरसला,श्रावणाच्या धारा !!धृ!!
श्रावण फुलला, आनंदले मन !
अंबरात धावे, जलमय घन !!
येई सरीवर सरी, पावसाचा मारा !
घन निळा बरसला,श्रावणाच्या धारा !!१!!
दामिनीचे नृत्त्य, मेघमल्हार साद !
रिमझिम धारा, पर्जन्याचा नाद !!
घोंगावतो वारा, तन मनांत शहारा !
घन निळा बरसला,श्रावणाच्या धारा !!२!!
मोतियांचे दाणे, दवबिंदु पर्णात !
मृद्धगंध पसरला, सुगंधी वनात !!
मंद शितल गारवा, नटखट वारा !
घन निळा बरसला,श्रावणाच्या धारा !!३!!
ऊन पावसाचा, लपंडाव खेळ !
इंद्रधनु कमान, सप्तरंगी मेळ !!
निसर्ग धुंद फुलला , अवनित सारा !
घन निळा बरसला,श्रावणाच्या धारा !!४!!
वनराई फुलली, मखमली हिरवळ !
नदी, नाले, जल, वाहे खळखळ !!
मंजुळ जल संगीत, वेचू शुभ्र गारा !
घन निळा बरसला,श्रावणाच्या धारा !!५!!
किलबिल किलबिल,पक्षी विहरती !
फळे,फुले,वेली,फुलपाखंरे बागडती !!
कोकीळ कुहू कुहू,मयुर नृत्य पिसारा !
घन निळा बरसला,श्रावणाच्या धारा !!६!!
©® कवयित्री, गीतकार
सौ. सुवर्णा विश्वास पवार
इचलकरंजी. ( कोल्हापूर )
संपर्क क्र. 9960301408
( खुला गट -१९ वर्षावरील )
दि . २० / ०६ / २०२६
स्वरचित
काव्यप्रकार = गीत लेखन
शीर्षक = घन निळा बरसला
( चाल = झाल्या तिन्हीसांजा )
ओथंबले घन, वर्षाव जलधारा !
घन निळा बरसला,श्रावणाच्या धारा !!धृ!!
श्रावण फुलला, आनंदले मन !
अंबरात धावे, जलमय घन !!
येई सरीवर सरी, पावसाचा मारा !
घन निळा बरसला,श्रावणाच्या धारा !!१!!
दामिनीचे नृत्त्य, मेघमल्हार साद !
रिमझिम धारा, पर्जन्याचा नाद !!
घोंगावतो वारा, तन मनांत शहारा !
घन निळा बरसला,श्रावणाच्या धारा !!२!!
मोतियांचे दाणे, दवबिंदु पर्णात !
मृद्धगंध पसरला, सुगंधी वनात !!
मंद शितल गारवा, नटखट वारा !
घन निळा बरसला,श्रावणाच्या धारा !!३!!
ऊन पावसाचा, लपंडाव खेळ !
इंद्रधनु कमान, सप्तरंगी मेळ !!
निसर्ग धुंद फुलला , अवनित सारा !
घन निळा बरसला,श्रावणाच्या धारा !!४!!
वनराई फुलली, मखमली हिरवळ !
नदी, नाले, जल, वाहे खळखळ !!
मंजुळ जल संगीत, वेचू शुभ्र गारा !
घन निळा बरसला,श्रावणाच्या धारा !!५!!
किलबिल किलबिल,पक्षी विहरती !
फळे,फुले,वेली,फुलपाखंरे बागडती !!
कोकीळ कुहू कुहू,मयुर नृत्य पिसारा !
घन निळा बरसला,श्रावणाच्या धारा !!६!!
©® कवयित्री, गीतकार
सौ. सुवर्णा विश्वास पवार
इचलकरंजी. ( कोल्हापूर )
संपर्क क्र. 9960301408