पावसावरील कविता स्पर्धा-2026 📅 2026-09-02 15:54:46 ✍️ लक्ष्मीकमल गेडाम | श्रावण आणि निसर्ग (विषय)
श्रावण ही लाजला

श्रावणाचा महिना
व्रत वैद्यांची वाट
घरोघरी अन् मंदिरी
चाले पुराण पाठ //

प्रभु भक्तीसाठी पावन
हाची महिना
आत्मा नंदी लागे टाळी
थोरात आणि साना //

पुण्य पदरी साठविण्या
करिती शिवनामाचा‌ घोष
संसारातील विटाळ,अमंगळ...
सरावा दोष...//

असा हा श्रावण
झाला पहा कोपमान
घन भारी वषर्ले
झाले उद्धवस्त जनजीवन //

पुरामध्ये वाहून गेले
कित्येक प्राण
माता पित्याचा गेला पूत्र
त्यांच्या पायातील गेले त्राण

कांताचा श्रीकांत गेला
म्हणे कुकुंम कुणाचे लेवु आता
//

बहिणीचा गेला भाऊ
भाऊबीजेला कुणा ओवाळु
मुलांचे गेले माता -पिता
कुणा आठवू‌ आता
ममतेचे छत्र गेले
दु:खाश्रू कोण पुशील त्राता //

घरं बसली...व्यसनं वाहिली
गाठीचा पैसा गेला
खुलं वाहिली...शेती ही बुडाली
जीव मुठीत आला //

धरणी कंठाने धरती हलली
कुठे वर्धा ..कुठे मोर्णा कोपली
जनजीवन सारे उध्वस्त जाहले
संसाराचे सुख स्वप्न भंगले //

जीवंतपणी देहाचे लचके तोडण्या..
गिधाडे ही जमली... अन्
सूर्य नंदन तांडव करू लागला दामिनी ही मस्ती झाली
वरूनराज का मनी तोषला ? //

म्हणे, श्रावण मासी‌ हर्ष मानसी
परि हर्ष मनाचा गेला
रूक्ष‌ सारे जनजीवन पाहुनी
श्रावण हा पण मनी लाजला
मनी लाजला //

कवयित्री
लक्ष्मीकमल गेडाम