पावसावरील कविता स्पर्धा-2026 📅 2026-09-02 06:40:19 ✍️ बी डी घरत | होताच पावसाचे आगमन
होताच पावसाचे आगमन
होताच पावसाचे आगमन
होताच पावसाचे ते आगमन
सुखावले ते पहा सारेच जन

येता सुखदच पहा पावसाळा
बाळ गोपाला आनंदच झाला
तवा गेले गडे देहची ते हरपून

अंगओळे होत होते रे उन्हानं
तेचि ओळे झालंया पावसानं
वाटे पावसाळाच जणू महान

फारंच तिव्र होता तो उन्हाळा
होत होतं तया ते उकडायला
वर्षाने खूष झाले कसे ते मन

होताच मेघगर्जना सभोवारी
पडताचि सरी उष्ण धरेवारी
झाले अवघेच तप्त शेतं-रानं

वरूणराजाची ती हजेरी तया
करी शितळ तृप्तच ती काया
तरी होई देह तवा ताजेतवानं
🕺🌧️ ⛈️बी.डी.घरत